अरेरे!
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 1 min read
शिवसेनेची आज कीव येते आहे!
आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी नाकदुऱ्या काढाव्या लागल्या आणि आता सरकारचं काम धड सुरूही झालेलं नसताना सरकार टिकवण्यासाठी , सावरकर प्रेमाची आपली भूमिका गुंडाळून ठेवून शिवसेनेचा स्वभाव नसलेल्या , सौम्य शब्दात त्यांना काँग्रेसला स्वतःची नाराजी (निषेध नव्हे) अवगत करावी लागते आहे.....
आपल्या भूमिकांवर ठाम राहणारे , त्यापायी सत्तेची फिकीर न करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आणि त्यांच्याच नावाचा उदो उदो करत मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेले त्यांचे पुत्र कुठे....
बाळासाहेबांशी दगाबाजी केल्यामुळे ज्या छगन भुजबळांच्या जीवावर शिवसेना उठली होती... ज्या बाळासाहेबांना छगन भुजबळ यांनी अटक केल्याने शिवसेना पिसाळली होती.... त्याच छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसणं आज त्यांच्या नशिबी आलेले आहे....भुजबळ माझ्या मंत्री मंडळात नकोत एवढीही अट मुख्यमंत्रीपद भूषविणारे उद्धव ठाकरे साधं शरद पवारांपुढेही ठेवू शकत नाहीयेत आणि ज्या सोनिया गांधींच्या विदेशी पणामुळे त्यांच्यावर सतत टीका केली, त्यांच्या पाठिंब्यावर, त्यांचेच आदेश मानत सरकार चालवण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे आणि आता ज्या सावरकरांना भारतरत्न द्यावं असा शिवसेनेचा आग्रह होता, त्याच सावरकरांचा अपमानही त्यांना मूग गिळून सहन करावा लागतो आहे......
बाळासाहेबांचा पराभव आज त्यांच्याच मुलाने व अनुयायांनी केला आहे!
आज बाळासाहेब नाही आहेत तेच बरे आहे!
ते मानाने जगले व मानानेच गेले....सत्ता आहे की नाही याने त्यांना काहीच, कधीच फरक पडला नाही!
[ १४ डिसेंबर २०१९]
Comments