माझी आई, माझा श्वास !
- jayashreedesaii
- Jul 31, 2020
- 1 min read
आज विलक्षण योग आहे. आज मदर्स डे आहे. आणि त्याचबरोबर माझ्या लेकाचा आदित्यचा वाढदिवसही आहे... माझी आई आणि माझा लेक यांच्यामधला दुवा असलेली मी...... यानिमित्ताने काही लिहिले आहे..... खरंतर माझ्यासारख्या प्रत्येक स्त्रीचच हे मनोगत असेल....
माझी आई माझा श्वास होती हे आत्ता कळतंय.... ती माझा बहीश्चर प्राण होती हे आत्ता कळतंय..... ती माझ्या रोमारोमात वसलीय हे आत्ता कळतंय...... ती माझ्या प्रत्येक कृतीत लपलीय हे आत्ता कळतंय.... माझा प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार तिच्यातूनच उमलतोय, हे आत्ता कळतंय.... आणि मी म्हणजे फक्त तिचीच, तिच्यातूनच उमललेली, तिनेच मनापासून घडवलेली, बहिरी ससाण्यासारखं लक्ष ठेवत जपलेली अन्, मायेच्या कोषात दडवलेली एक मूर्ती आहे हे आत्ता कळतंय! ती असताना नको वाटायचा तिचा जाच, ती शिस्त, तो परफेक्शनचा अट्टाहास, आता कान तरसतात त्यासाठी.... मग लक्षात येतं की ती गेलीच आहे कुठे? तिचं आईपण माझ्यात रुजवून ती वसलीय माझ्याच श्वासात, माझ्याच रोमारोमात....
जीवनाचा हा नात्यांतून वाहात आलेला आदिम प्रवाह आत्ता कळतोय.........
Comentários