top of page
Search

हे असंच आणखी किती काळ?

  • Writer: jayashreedesaii
    jayashreedesaii
  • Jul 31, 2020
  • 1 min read

राज्य कर्त्यांना नावे ठेवणे फारच सोपे आहे . आपण आजवर तेच करत आलोयत. पण दुर्दैवाने आपणही अशी काही भीषण दुर्घटना घडली कीच खडबडून जागे होतो हे वास्तव कसे नाकारता येईल?

आज काल तर सोशल मिडिया वरून मत प्रदर्शन केले, त्याला अनेकांनी लाईक्स दिले की आपले सामाजिक कर्तव्य संपतेय ...याची आपल्याला जाणीव आहे ?

असे ब्रिजेस लहान पडतायत ,काही आपण ते क्रॉस करत असताना गदा गदा हलतात तेव्हा त्यावरून जाताना ही भीती वाटते ,पण आपण एकदा तो क्रॉस केला की ती भीतीची जाणीव सुद्धा विसरून जातोय हे तरी आपल्याला जाणवतंय?

Public memory is very short...या वास्तवाचा लाभ घेऊन सत्ताधीश असं काही घडलं की चौकशीचे आदेश देतात , चौकशी समित्या स्थापन होतात , त्यांच्या अहवालाची आपल्याला काही पडलेली नसते ...ते अहवाल बहुतेकदा बासनातच गुंडाळले जातात....आपण आपल्या कामात गर्क होतो , राज्यकर्ते त्यांच्या !

आपण २०१९ ची निवडणूक राज्य कर्त्यांना किती कठीण जाणार यावर २ वर्षं आधीपासूनच चर्चा करत आपली फुशारकी गाजवत राहतो ...त्यानाही २०१९ चेच लक्ष गाठायचे असते .जन मानसातले सुप्त प्रवाह त्यानाही माहित असतात ..त्यामुळे तेही सगळी शक्ती एकवटून त्याच सत्ता सिंहासनाकडे बघत असतात ...आपल्या रोजच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाकडे?

ही लोकशाही आहे .त्यामुळे लोक प्रतिनिधींच कर्तव्य आहेच .पण त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम लोकांचं नाही का?

You get what you deserve !

याचा दाहक अनुभव आपण रोज घेतोय ...जे गेले वा जखमी झाले त्यात आपण वा आपल्या घरातलं कुणी नव्हतं म्हणून सुस्कारा सोडतोय ...हे असंच आणखी किती काळ चालणार या प्रश्नाने मला अस्वस्थ केलं आहे ...

आला आला दसरा, दुख सारे विसरा असं आपण म्हणत आलो ...

असा कसा आला हो हा दसरा...?

[२९ सप्टेंबर २०१७]

 
 
 

Recent Posts

See All
३ शतकांचा वनवास संपत आला !

अयोध्येतील सुवर्ण क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे ....रामाचा आधुनिक वनवास संपायचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. सारी अयोध्या एखाद्या...

 
 
 
स्वप्नपूर्तीच्या दिशेने!

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी नेत्रदीपक रोषणाईने नटलेली, आकर्षक भित्ती चित्रांनी सजलेली अयोध्या बघताना मन नकळत भूत काळात...

 
 
 
अरेरे!

शिवसेनेची आज कीव येते आहे! आधी राज्यात चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेस पुढे, त्यांच्या इटालियन नेतृत्वापुढे सरकार स्थापनेसाठी...

 
 
 

Opmerkingen


bottom of page